Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिलासादायक : धरणगावात आठ संशयितांचा अहवाल निगेटीव्ह; अकरा अहवाल प्रलंबित

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोविड केअर सेंटरने १९ संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते, त्यापैकी ८ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून आठही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. उर्वरित ११ अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान, धरणगाव तालुका कोरोनामुक्तकडे वाटचाल करत आहे.

१९ संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते, त्यापैकी ८ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून आठही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. या वृत्ताला नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. धरणगाव शहरामध्ये एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० होती. त्यापैकी दोन महिलांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. उरलेले आठ कोरोनाबाधित रुग्ण धरणगाव कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत होते. त्यापैकी सलग दहा दिवसांपासून उपचार घेत असलेले सात रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना मंगळवारी वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णवाहिकेद्वारे घरी सोडण्यात आले. कोविड केअर सेंटर धरणगाव येथे आता एक कोरोनाग्रस्त उपचार घेत आहे. या रुग्णालासुद्धा आज रोजी कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आता एकच रूग्ण असल्याने धरणगाव तालुका कोरोनामुक्तकडे वाटचाल सुरू आहे. तरीही खबरदारी म्हणून नागरीकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून घरांमध्ये सुरक्षित राहण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version