Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिपनगर येथे निळे निशाण संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दिपनगर येथे सुरक्षा रक्षकांचे ठेकेदारी पध्दत बंद करून इतर बाहेरील कंपनीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकाना नेमण्यात येत असल्याच्या विरोधात निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने शुक्रवारी दिपनगर कंपनीसमोर आंदोलन करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षारक्षक कंपन्यांमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षा पासून  सुरक्षा विभागाच्या कार्यरत असून अचानकपणे ठेकेदारी पद्धत संपल्यामुळे घरी बसून आहेत. त्यामुळे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.  या प्रसंगात परिवारातील व्यक्तीचे काही बरे-वाईट झाल्यास दिपनगर प्रशासन जबाबदार राहील असे सांगितले. मागील दोन अडीच महिन्यापासून ठेकेदारी बंद असल्यामुळे घरी बसविण्यात आले.  सीडीएसएस कंपनीतील ८० सुरक्षा कर्मचारी व रक्षक कंपनीतील ८० कर्मचारी यांना काम नसल्याने घरीच बसून आहेत ते ही या आशेने की, आमचा ठेकेदारी पध्दत परत चालू होईल आणि परत रोजगार मिळेल परंतू जेव्हा माहिती मिळते की,  स्थानिक कंपनी यांना सुरक्षा रक्षक चे कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही आहे, हा कॉन्ट्रॅक्ट बाहेरील कंपन्यांना मिळत आहे आणि असे झाल्यास बाहेरील कंपन्या येथे आल्यास आमचा स्थानिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना रोजगार जाऊ शकतो.  बाहेरील कंपन्या सोबत आमचा कुठलाही ही वैर नाही परंतु त्यामुळे जर आमच्या स्थानिक रोजगार निर्माण होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही पण सांगितले अन्यथा आम्हाला येत्या १० दिवसात न्याय न मिळाल्यास  २० फेब्रुवारी रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने स्थानिक मजुरांवर होणाऱ्या अन्यायाचा विरोधात आमरण उपोषण करु  व उद्भवणाऱ्या परिस्थितीस स्वतः प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. 

 

Exit mobile version