Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिपनगर परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

two wheelar thift

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील दिपनगर वसाहतीतून तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मोन मारोती फड (वय-३३) रा. दिपनगर वसाहत ता. भुसावळ जि. जळगाव हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे कामाच्या निमित्ताने (एमएच १९ सीए ४७५) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ते कामावर आले. त्यावेळी त्यांनी त्यांची दुकाची त्यांच्या घराच्या समोर पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी मोहन फड यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शामकुमार मोरे करीत आहे.

Exit mobile version