Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिपनगर, निंभोरावासीयांची परप्रांतीयांना भोजनाच्या बंद पाकीटांचे वाटप

भुसावळ, प्रतिनिधी ।तालुक्यातील दिपनगर समोर तसेच हाँटेल त्रिमूर्ती जवळ गेल्या दोन आठवड्यांपासून परप्रांतीयांसाठी निरंतर भोजनदान केले जात आहे. त्याच प्रमाणे औषधे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चप्पला बुटे आदींची सोय या सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्यातर्फे केली जात आहे.

दिपनगर येथील ६६० प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी स्वखर्चाने भोजनाचे बंद पाकीट चे वाटप करीत आहे. तर ५०० मेःवँ.प्रकल्पातील मुख्य अभियंता पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर यांच्या मार्गदर्शना खाली विविध संघटनेचे पदाधिकारी,अधिकारी यांच्या मार्फत ही भोजनाची व्यवस्था केली जात आहे. त्याच प्रमाणे येथील सामाजिक संघटना रोटरी क्लब ,विश्वरत्न महिला बचतगट, वंचित बहुजन कंत्राटदार संघटना, स्थानिक सोपान चौधर व मित्र मंडळ वारसा समाजसेवेचा ,सुरक्षा विभाग, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना,एस इ ऐ, मागासवर्गीय कर्मचारी संघटना, ड्राइवर क्लिनर संघटना, गणपती मंडळ, भाग्यश्री चौथे, प्रीतम दीक्षित,चांदणी गार्डन मित्रमंडळ व दिपनगर मधील सर्व अधिकारी ,अभियंते कर्मचारी व कंत्राटदार यांनी या कामात भरघोस प्रतिसाद दिला. कंत्राटदार संघटना यांच्यातर्फे ही भोजनदान केले जात आहे. येथील राजेंद्र निकम,यशवंत शिरसाठ, कंत्राटदार संघटनेचे प्रकाश सरदार, फिरोज पठाण यांच्यासह दिपनगर, निंभोरा येथील युवक परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version