Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारू पिण्यास पैसे न दिल्याने रिक्षाचालकावर चॉपरने वार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर हुडको भागात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला झाल्याची घटना २५ रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी गजानन विलास बाविस्कर रा. शिवाजीनगर, हुडको याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील नवीन घरकुल हुडको या ठिकाणी जनार्दन सोमनाथ कोळी (वय -४३) हे पत्नी साधना व मुलांसह वास्तव्यास आहे. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. २५ रोजी रात्री जनार्दन कोळी हे रिक्षा घेऊन घरी जात असताना गजानन विलास बाविस्कर रा. शिवाजीनगर हुडको याने कोळी यांना अडविले तसेच दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. कोळी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा गजानन बाविस्कर याने चॉपरने कोळी यांच्या उजव्या हातावर वार करुन दुखापत केली. यानंतर जनार्दन कोळी हे पत्नी साधनासह पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास गेले असता यादरम्यानही बाविस्कर याने कोळी यांच्यासह पत्नीस अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली . याप्रकरणी जनार्दन कोळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गजानन विलास बाविस्कर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे . पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Exit mobile version