Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चाकू हल्ला : आरोपी फरार

भुसावळ प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर चाकू हल्ला करण्यात आला असून यातील आरोपी हा फरार झाला आहे.

दीनदयाल नगर भागातील शेख चांद शेख हमीद यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. यानुसार दिनदयाल नगर भागातील शेख चांद शेख हमीद यांचे राहते घरात गु.र.न.८५५/२०२० भा.द.वि. कलम ४५२,३२४,३२३,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी नामे अजय दिगंबर जाधव (राहणार वडगाव तालुका भडगाव हल्ली मुक्काम भुसावळ) व त्यांच्या इतर साथीदारांनी शेख चांद शेख हमीद यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता फिर्यादी यांनी पैसे दिले नाही. यामुळे आरोपीने त्याच्या खिशातून चाकू काढून फिर्यादी यांचे डाव्या हाताचे कामे वर मारून दुखापत केली. फिर्यादीची आई यांना देखील डाव्या मांडीवर दुखापत केली व मारण्याची धमकी दिली वगैरे मजकुराचे तक्रारीवरून बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी नामे अजय दिगंबर जाधव हा वर नमूद गुन्ह्यात फरार असून तो भडगाव तसेच भुसावळ शहरात व तालुक्यात किंवा जळगाव जिल्ह्यात इतर ठिकाणी कोठे राहतो याबाबतचा शोध पोलीस प्रशासन घेत असून या आरोपी संदर्भात माहिती असल्यास भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version