Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारू पिण्यासाठी आईसह आजीआजोबांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारु पिण्यासाठी पैसे मागत तरुणाने आईसह आपल्या आजी आजोबांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर काठीने वार करुन गंभीर जखमी केल्याची शाहूनगरातील इंदिरानगरात रविवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शाहूनगरातील इंदिरानगरात हमीदाबी पिरण शेख (वय-७२) या वृद्ध महिला आपल्या कुटुंंबियांसह वास्तव्यास असून गेल्या चार महिन्यांपासून त्यांची मुलगी शमीम बी शेख पिरण या त्यांच्यासोबत राहत आहे. रविवारी २३ एप्रिल रोजी रोजी सकाळी ९ वाजता हे घरात झोपलेले असतांना त्यांची मुलगी शमीमबी शेख पिरण यांचा मुलगा जाफर शेख हा दारू पिवून आणखी दारु पिण्यासाठी पैसे मागायला त्यांच्या घरी आला. त्याने आपल्या आईला शिवीगाळ करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या कपाळावर धारदार वस्तूने मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांचा वाद सोडविण्यासाठी वृद्ध महिला व त्यांचा मुलगा शाहरुख हा गेला असता, त्यांच्या डोक्यात लाकडी काठी टाकून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वृद्धेने तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे.

Exit mobile version