Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूसाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण; रावेर पोलीसात गुन्हा

रावेर प्रतिनिधी ।  पुन्हा दारू पिण्यासाठी १० रूपये दिले नाही म्हणून दारूच्या नशेत एकाने प्रौढाला मारहाण करून हाताची करंगळी मोडल्याची घटना तालुक्यातील लालमाती येथे घडली. याप्रकरणी एकावर रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, रामसिंग मोहन पवार (वय-५५) रा. लालमाती ता. रावेर हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शरीफ माजीत तडवी रा. लोहारा ता. पाचोरा हा कामाच्या निमित्ताने गावात आला होता. दुपारी रामसिंग पवार यांच्याकडे शरीफ तडवी हा दारूच्या नशेत येवून दारू पिण्यासाठी १० रूपये मागितले. रामसिंग यांनी पैसे न दिल्याने याचा राग येवून संशयित आरोपी शरीफ तडवी याने रामसिंग पवार याला मारहाण केली व डाव्या हाताच्या करंगळी वाकवून दुखापत केली. याप्रकरणी रावेर पोलीसात संशयित आरोपी शरीफ तडवी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र राठोड करीत आहे. 

Exit mobile version