Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून तिघांना मारहाण !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार, १८ ऑक्टोंबर रोजी रामानंदनगर पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील शामनगर भागात अरुण कौतिक निंबाळकर वय ५९ हे वास्तव्यास आहेत. १७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अरुण निंबाळकर हे हरिविठ्ठल नगर भागातील नवनाथ चौकाजवळ असतांना त्यांना संदीप पाटील व भरत राठोड या दोघांनी दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यास नकार दिला असता, अरुण निंबाळकर यांना दोघांनी शिवीगाळ करत दगडाने तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. याचदरम्यान अरुण निंबाळकर याच्या शालक व त्याची पत्नी यांनाही संबंधितांनी मारहाण केली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मंगळवार, १८ ऑक्टोंबर रोजी अरुण निंबाळक यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संदीप पाटील व भरत राठोड दोन्ही रा. नवनाथ नगर, जळगाव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत.

 

Exit mobile version