Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूच्या नशेत विहीरीत उडी मारून एकाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी शिवारातील एका शेतातील विहीरीत ५१ वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत उडीमारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, मनोज गोपीचंद जाधव (वय-५१) रा. खेडी ता.जि.जळगाव यांनी दारूच्या नशेत खेडी शिवारातील एका शेतातील विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. दरम्यान मयताचा मावसभाऊ पंडीत उत्तम मराठे यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एएसआय किरण पाठक करीत आहे.

Exit mobile version