Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूच्या नशेत बापलेकीला शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील तांबापुरा येथे दारूच्या नशेत येऊन बाप व लेकीला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरुवार १३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख शकील शेख कादर (वय-४०) रा. तांबापुरा, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १३ एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शेख शकील हे घरी असताना विशाल सुभाष भोई (वय-२०) रा.तांबापुरा हा दारूच्या नशेत येऊन शेख शकील यांना कारण नसताना मारहाण केली. तसेच शेख शकील यांची मुलगी सानिया शेख हिला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर शेख शकील यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी विशाल सुभाष भोई याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.

Exit mobile version