Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूच्या नशेत पत्नीसह मुलांना मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा 

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विठ्ठलवाडी भागात पोटच्या मुलांसह पत्नीला दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती मनीषा नामदेव कोळी ह्या विवाहिता पती नामदेव जगन्नाथ कोळी व मुलांसह शहरातील विठ्ठल वाडी येथे वास्तव्याला आहे. पती नामदेव कोळी याला दारूचे व्यसन आहे. नेहमीप्रमाणे मंगळवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नामदेव कोळी हा दारूच्या नशेत आला. व त्याच्या मुलांना मारहाण करून शिवीगाळ करत होता. याबाबत पत्नी मनीषा कोळी यांनी जाब विचारला असता. रागात येवून नामदेव कोळी याने पत्नीला मारहाण करून गालावर चावा घेतला.

यासंदर्भात विवाहितेन यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती नामदेव जगन्नाथ कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बालक बाऱ्हे करीत आहे.

Exit mobile version