Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूच्या नशेत एकावर धारदार शस्त्राने वार

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद येथे काहीही कारण नसतांना दारूच्या नशेत एकाला मारहाण करून धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल पंडीत तायडे (वय-४९) रा. इंदीरा नगर, बामणोद, ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिवाह करतात. बुधवार ३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता सुनिल हा त्याचा मित्र नरेंद्र छोटू लोहार याच्यासोबत गप्पा मारत असतांना गावातील सागर मुरलीधर सोनवणे याने दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करून धारदार वस्तूने वार करून जखमी केले. याबाबत सुनिल तायडे याने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी फैजपूर पोलीस ठाण्यात सागर सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे.

Exit mobile version