Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दाणाबाजारातून तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दाणाबाजारात फुले मार्केटच्या लोखंडी गेटजवळून तरुणाची दुचाकी लांबविल्याप्रकरणी शनिवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धामणगाव येथे योगराज लक्ष्मण सपकाळे वय ३९ हे वास्तव्यास आहेत. योगराज हे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दाणाबाजारात आले, यादरम्यान त्यांनी त्यांची (एम एच. १९ बी.सी.८००५) या क्रमाकांची दुचाकी दाणाबाजारात फुले मार्केटच्या लोखंडी गेटजवळ उभी केली होती. अर्धातासात काम आटोपून परतल्यावर योगराज यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने दुसऱ्या दिवशी शनिवारी योगराज यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन २० हजारांची दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण हे करीत आहेत.

Exit mobile version