Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहीहंडीसाठी सज्ज झाले तरुणींचे गोविंदा पथक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने काव्यरत्नावली चौकात तरुणींंच्या  दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे शुक्रवार दि. १९ ऑगस्ट  रोजी काव्यरत्नावली चौक येथे सायंकाळ  ६  वाजेपासून तरूणींच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मुलींचे गोविंदा पथक, शिवतांडव प्रतिष्ठान चे १३०  वादकांचे ढोल पथक, हायटेक लाईटस, बालगोपालांसाठी श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा, मल्लखांब चे थरारक प्रात्यक्षीक, सांस्कृतिक नृत्य आदी. या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. जळगाव जिल्ह्यात सार्वजनिकरित्या युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे एकमेव तरूणींच्या गोविंदा पथकाची दहीहंडी आयोजित करण्यात येते. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जैन इरिगेशन सिस्टम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, सिद्धीविनयक गणपती मंदिर न्यास चे कोषाध्यक्ष संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, संदिप गवळी, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  युवाशक्ती फाऊंडेशनचे १५०  स्वयंसेवक विशेष गणवेशात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेणार आहेत. कोरोना काळानंतर प्रथमच शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सवाचे आयोजन होत आहे. तरी जास्तीतजास्त जळगावकर नागरिकांनी या आयोजनात सहभागी व्हावे असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीय व सचिव अमित जगताप यांनी केले आहे.

 

Exit mobile version