Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहीगावात कांदा खरेदीसाठी आलेला कोरोनाचा संशयित व्यक्ती १८ जणांच्या संपर्कात!; गावात भीतीचे वातावरण

यावल प्रतिनिधी । येथील काही कांदा वाहतूक करणारे मजूर वाहनचालक हा कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून आज तालुक्यातील ग्रामीण भागातील १८ जणांना होम करोरंटाईन करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामूळे दहिगावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
                     
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, काल १७ एप्रिल रोजी यावल तालुक्यातील दहिगाव गावातून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यासाठी काही परप्रांतीय व्यापारी ट्रकचालक घेऊन आले असता त्यातील एक ट्रक कांदा भरून आंध्र प्रदेशकडे रवाना झाले होते. नांदेड जवळ असलेल्या सीमारेषेवरील असलेल्या महाराष्ट्र-आंध्रप्रदेशच्या चेक पोस्टवर आरोग्य तपासणी केली असता एका व्यक्तीस कोरोनाचा संशयित रुग्ण असल्याचे प्रथम उपचारांमध्ये दिसून आले. आंध्रप्रदेश शासनाने त्वरित दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाला कळविल्याने शासनाने तात्काळ  दक्षता घेऊन जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा सज्ज करून तात्काळ त्या गावात आरोग्य पथकास पाठविले असून त्याठिकाणी सुमारे १८ लोकांची आरोग्य चाचणी करून त्यांना तात्काळ कवॉटरटाईन करण्यात आले आहे. सदरचे ट्रक हे कांदा खरेदी करण्यासाठी कोणकोणत्या  गावाने आले. याची चौकशी करून तात्काळ त्यांच्यासोबत असलेले इतर ट्रकचालक व व्यापाऱ्यांना ही सर्व व्यक्ती हे कोरोना रुग्नाच्या संपर्कात आलेल्या आंध्र प्रदेशातील ट्रकचालकांनी तालुक्यातील ग्रामीण भागातून कांदे  वाहतुक केले. त्या चालकांच्या सपर्कात आलेल्या सहा जनांचा येथील ग्रामीण रुग्नालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, तंत्रज्ञ सुर्यकांत पाटील पोलीस पथकासह रवाना झाले. कांदा भरणाऱ्या मजुरांसह ११ जनांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार जितेन्‍द्र कुवर, सपोनि जितेंद्र खैरनार, सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ गौरव भोईटे आरोग्य यांच्यासह आरोग्य यंत्रणा याठिकाणी हजर असून सर्व होम कॉरनटाईन केलेल्या लोकांना तात्काळ जळगाव येथे पाठवण्यात येत आहे.

Exit mobile version