Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहिगाव शिवारात सर्पमित्राने पकडला बारा फुटी अजगर

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव शिवारातील गहूच्या शेतातून सर्पमित्र तथा सरपंच अजय अडकमोल यांनी बारा फुटी अजगराला पकडण्यात यश आले आहे. यामुळे शेतकऱ्याने त्यांचे आभार व्यक्त केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दहीगाव शिवारातील लीलाधर बादु पाटील यांचे झापेल नाल्याच्या लगत असलेल्या गव्हाच्या शेतात १२ फुटी अजगर आढळल्याने गहू काढणाऱ्यामध्ये घबराट निर्माण झाली. शिताफीने सर्पमित्र सरपंच अजय बाळू अडकमोल यांनी पकडून सातपुड्याच्या जंगलात सोडले आहे. येथून जवळच असलेल्या सातपुडा कडे जाणाऱ्या मार्ग या मार्गावरील झापेल नाल्याच्या लगत असलेल्या शिवारात लीलाधर बाळू पाटील यांचे शेतात गहू काढण्याचे मशीन गेले असता बांदा लगत गव्हात अजगर दडलेला होता. मशीनचा आवाज आल्याने हा अजगर गावातून बाहेर निघायला लागतात मजुरांना तो दिसून आला तत्काळ सर्पमित्र येथील सरपंच अजय बाळू अडकमोल यांना मालकांनी भ्रमण दूरध्वनीवरून कळविले. अडकमोल तात्काळ तिथे पोचताच त्यांनी आज घराला पकडले व त्यांनी रीतसर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले पकडलेला अगोदर त्यांनी नागा देवी पाझर तलावात नेऊन सोडला आहे नवनिर्वाचित सरपंच पदावर असतानाह विषारी सर्प वजनदार पकडून जंगलामध्ये सोडून देत आहेत व संबंधित व्यक्तींवर निर्माण झालेला घबराटीचे कमी करीन आहे याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाचे अधिकारी विशाल कुठे यांना दिली त्यांच्या सांगितल्यावरून त्यांनी पकडले. 

 

Exit mobile version