Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहिगाव येथे महादेव आणि मारूती मंदीराच्या प्राणप्रतिष्ठनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुलुक्यातील दहिगाव येथे गावातील प्रसिद्ध असे श्री महादेव व मारुती मंदिराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास बुधवार २२ मार्च रोजी पासुन भक्तीमय वातावरणात प्रारंभ होत आहे. या निमित्ताने भव्य दिंडीचे आयोजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दहिगाव तालुका यावल येथील महादेव व मारुती मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा २३ मार्च रोजी होणार आहे. या निमित्ताने श्री महाशिवपुराण ज्ञान यज्ञ सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे. २३ रोजी सायंकाळी भव्य दिंडी सोहळ्याची मिरवणुक गावातून काढण्यात येणार आहे. या सप्ताहाची रुपरेषा पुढील प्रमाणे दुपारी २.३० वाजता व रात्री १२.३० वाजता कथा वाचन होईल कथेची पूर्ण होती. चैत्र शुद्ध अष्टमी २९ मार्च रोजी होणार आहे सप्ताहात सद्गुरु शास्त्री स्वामी सरजू दासजी वडताल हे वक्ता राहणार आहेत तर आचार्य राकेश प्रसादजी महाराज, प्रेम प्रकाशदासजी, प्रभू स्वामी उपस्थित राहणार आहे. सायंकाळी भव्य दिंडी सोहळा काढण्यात येणार आहे. सप्ताहात शिवसती, दर्शन शिवपार्वती विवाह, गणपती प्रगट, दत्त चरित्र, हनुमंत अवतार, ज्योती लिंग पूजन, वृंदावन की रासलीला, भक्ती मती, राणी मीराबाई, सुंदर कांड यासह आदी  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

काल्याचे किर्तन, हभप राजेंद्र महाराज केकत निंभोराकर यांचे रात्री ८ वाजता होणार आहे. तर दैनंदिन कार्यक्रमात रोज सकाळी ५.३० वाजता आणि संध्याकाळी ५.३० वाजता काकड आरती होणार आहे. २९ रोजी कथा वेळ सकाळी ८ वाजता महाप्रसाद दुपारी १२ वाजता आणि दिंडी सोहळा सायंकाळी ४ वाजता आयोजित केलेला आहे. कार्यक्रमात समस्त सहकारी भजनी मंडळ आडगाव, कासारखेडा, चिंचोली, डोनगाव, किनगाव, मालोद, नायगाव, साखळी, चिंचाळे, विरवली, नावरे, कोर पावली, मोहराळे, दहिगाव येथील भजनी राहणार आहेत. तर हभप नामदेव गुरुजी, उद्धव महाराज, राहुल महाराज, प्रथम चंद्र महाराज, रमेश महाराज यांची उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी दहिगाव यांनी केले आहे.

Exit mobile version