Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहिगाव येथील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोस्ट कर्मचाऱ्यांचा गौरव

 

यावल, प्रतिनिधी। तालुक्यातील दहिगाव पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तरांनी ऑक्टोबर महिन्यांत भुसावळ विभागात सर्वाधिक ग्राहकांचे खाते उघडल्यांमूळे पोस्ट कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन विभाग प्रमुख पी. बी. सेलुकर यांच्या हस्ते दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करून गौरव करण्यात आला.

पोस्टमास्तर भागवत सिताराम सरोदे यांनी तसेच त्यांचे सहकारी जीवन उभारणे या दोघा मिळून गेल्या महिन्यात भुसावळ विभागात सर्वाधिक खाते उघडून विशेष कामगिरी दाखविले म्हणून त्यांचा गौरव आला. याप्रसंगी डाक घर निरीक्षक पी. एस. मालकर, डी. आय. अग्रवाल, भरत तेली विशेष अतिथी म्हणुन उपस्थित होते. पोस्ट ऑफिस मध्ये आता बँक सुविधान प्रमाणे सर्व सुविधा कमी दरामध्ये उपलब्ध होणार आहेत आधारित गुप्ता सेवा यासह अनेक सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत त्यामुळे पोस्ट ऑफिस चा जास्तीत जास्त उपयोग ग्राहकांनी करून घ्यावा असे आवाहन विभागप्रमुख सेलूकर यांनी केले आहे तसेच ग्राहकांनी बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिस मध्ये आपले खाते उघडुन करून पोस्ट खात्याला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असेही आवाहन यावेळी उपस्थितांच्या वतीने करण्यात आले आहे

याप्रसंगी पोलीस पाटील संतोष शिवराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र पाटील, जितेंद्र सूर्यवंशी, तलाठी विकास नागरे, जैन, महाजन, कैलास पाटील, दिलीप सरोदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version