दहशतवादी भारतात सक्रीय होण्याच्या तयारीत

नवी दिल्ली  एकीकडे तालीबान सत्तारूढ होत असतांना दुसरीकडे पाक समर्थीत सुमारे दोनशे दहशतवादी भारतात सक्रीय होण्याच्या तयारीत असल्याचा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी जारी केला आहे.

 

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्यात आयएसआयचा मोलाचा वाटा आहे. आयएसआयच्या मदतीमुळेच तालिबानला अफगाणिस्तान काबीज करता आला. त्यानंतर आता आयएसआयनं लष्कर-ए-तोएबा, जेईएम आणि अल-बद्रच्या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २ महिन्यांपासून दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जात आहेत. सध्याच्या घडीला जम्मू-काश्मीरात जवळपास २०० दहशतवादी सक्रीय आहेत. यामध्ये परदेशी आणि स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. ते घातपात घडवू शकतात.

आयएसआयचे मनसुबे पाहता भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.  पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त वाढवला आहे. तसेच देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content