Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दलितांना स्वयंसुरक्षेसाठी शस्त्रांचा परवाना द्या : चंद्रशेखर आझाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । उत्तरप्रदेशातील घटनेमुळे दलीतांवरील अत्याचाराची भयावह बाजू समोर आली असून देशभरातील दलितांना संरक्षणासाठी शस्त्रांचा परवाना देण्याची मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे.

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी हाथरस प्रकरणी आधीपासूनच आक्रमक पवित्रा घातले आहे. यातच आता हे प्रकरण वादाच्या भोवर्‍यात सापडल्यानंतर त्यांनी योगी सरकारवर आरोप केला आहे की, मुख्यमंत्री जातियवादी आहेत. त्यामुळंच न्याय होत नाहीय. पीडितांनाच मारलं जात आहे, असं ते म्हणाले.

त्यांनी दलितांना हत्यार वापरण्याचं लायसन्स द्या, अशी मागणी देखील केली आहे. चंद्रशेखर आझाद म्हणाले की, पुराव्यांशी छेडछाड करणं गुन्हा आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं गेलं आहे. त्यांनी मागणी केली की, दलितांना वीस लाख हत्यार दिली जावी ज्यांना लायसन्स असेल. लाखो लोकांजवळ लायसन्स आहेत. त्यांनी वाल्मिकी समाजाला आवाहन केलं की जोवर न्याय मिळत नाही तोवर साफसफाई करु नका, कामावर जाऊ नका.

Exit mobile version