Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दलालांची महिलेसह पती , मुलाला मारहाण

 

सावदा, प्रतिनिधी । येथे दुय्यम निबंधक कार्यलया समोरील मोकळ्या जागेत शेती खरेदी विक्री करण्याचे कमिशन न दिल्याने एक महिलेस व तिच्या पती व मुलास दोघांनी मारहाण करून शिवीगाळ केली. महिलेच्या तक्रारीवरून सावदा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, जळगाव मधील शिवकॉलनी येथील अनिता प्रेमचंद मनुरे यांना व त्यांचे पती व मुलास शेती खरेदी विक्री करण्याचे कमिशन का दिले नाही असे म्हणत करीम तडवी (रा. वडगाव ता. रावेर) व जितेंद्र डोंगर वानखेडे (रा. चिनवल ता. रावेर) यांनी दुय्यम निबंधक कार्यलया समोरील मोकळ्या जागेत मारहाण व शिवीगाळ केली. आरोप जितेंद्र वानखेडे याने अनिता मनुरे यांच्या मुलास पकडले असता त्या व त्यांचे पती मुलाला सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी जितेंद्र वानखेडे याने खिश्यातुन छोटे कटर काढून अनिता मनुरे यांच्या उजव्या हाताच्या बोटावर मारून दुखापत केली. शिवीगाळ व मारहाण केल्याने आरोपींवर भाग ५, गु. र. नं. ४४/२०२०, भादंवि कलम २९४, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पो. हे. कॉ. उमेश पाटील करीत आहेत. तर दाखल अंमलदार म्हणून ममता तडवी काम पाहत आहेत.

Exit mobile version