Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दर्जी फाऊंडेशनचे घवघवीत यश; पीएसआयपदी १०२ विद्यार्थ्यांची निवड

जळगाव प्रतिनिधी । येथील दर्जी फाऊंडेशनच्या १०२ विद्यार्थ्यांची पीएसआय पदी निवड झाली असून यातील रोहित काळे या विद्यार्थ्याने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक कक्षाधिकारी – २०१८ या परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. आयोगातर्फे जाहीर झालेल्या निकालात सहाय्यक कक्षाधिकारी पदी रोहीत मधुकर काळे व शितल विठ्ठल ऐवाळे हे यशस्वी झालेले आहेत. तर रोहीत काळे या विद्यार्थ्याने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने बाजी मारलेली आहे. तसेच १०२ विद्यार्थ्यांनी पीएसआय पदी घवघवीत यश संपादन केलेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रोशन आहिरे, महेश अंजनवाड, ज्ञानेश्‍वर आसबे, शेखर औटे, सिध्देश्‍वर अवचार, धनश्री बाजगीरे, निलेश बर्गे, पंकज बावने, राहुल बिघोत, सुनिल ब्रह्मनाथ, प्रियंका चव्हाण, संदिप चव्हाण, मनोज चव्हाण, श्रध्दा चोंधे, अमित देशमुख, सुदर्शन ढोबळे, ज्ञानेश्‍वर धुमाळ, ज्योती डोके, सुनीता घाडगे, अविनाश घोरपडे, अनंत गिरे, हर्षद इंगोले, कुणाल जाधव, योगेश जाधव, अजिंक्य जाधव, परमेश्‍वर जाधव, शशांक जाधव, विनाश जाधव, मनोज जासुद, अर्जुन कदम, विकास कदम, शरद काकळीज, गणेश काळे, विश्‍वंभर कारळे, दीपक खरात, अशोक खेडकर, ज्योती कोकणी, प्रविण काळे, संध्या कोळी, संतोष कोळी, श्रीकांत कोरेवार, मोहन कोतलवाल, दीपक कुंभार, गोविंद कुटे, सागर माने, सुजाता मनवर, प्रफुल्ल मासाळ, निशिगंधा मस्के, जीवन म्हस्के, करिष्मा मोरे, संतोष नागरगोजे, महेश निकम, नवनाथ पांढरे, पुजा पांढरे, अशोक पाटील, मंगेश पाटील, मयुर पाटील, सत्यशील पाटील, गोविंद पवार, युवराज पोमन, नागेश पुन्नावड, कल्याणी राजगुरू, रश्मिता साहू, संकेत सरवते, अक्षय शिलीमकर, गणेश शिंदे, लक्ष्मण शिंदे, सुमित सोनवणे, ऋषिकेश तळेकर, सखाहरी तायडे, निलकंठ तिळके, दिलीप वाव्हळ, आकाश व्हावळे, भारती यमगार, रुपाली सोनवणे, वर्षा शेडमे, दुर्गा खर्डे, राज डोड्यालकर, गोकुळ खैरनार, विशाल सपकाळे, मनोज तिपळे, अमित पवार, संजय सिंग, निलेश बोराडे, प्रियंका बागुल, विशाल पवार, साईनाथ नरवाडे, संगमेश्‍वर एकाडे, किरणकुमार ठोंबरे, गौरव राठोड, संतोष गुट्टे, सचिन भगत, चेतन पवार, शैलेश चौधरी, मंगेश बिडकर, प्रदिप बोर्हाडे हे विद्यार्थी पीएसआयपदी यशस्वी झालेले आहेत.

या निकालाबाबत माहिती देतांना प्रा. गोपाल दर्जी म्हणाले की, हे यशाचे गमक म्हणजे दर्जी फाऊंडेशनचे आयसीडीसीचे मॉड्युल होय. या मॉड्युलमध्ये १० वी व १२ वी पास विद्यार्थ्यांना तीन व पाच वर्षाचे पदवी या शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन दिल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने व सर्वोत्तम निकाल दर्जी फाऊंडेशनचा लागत आहे. तरी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय करियर करु इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी समुपदेशनासाठी दर्जी फाऊंडेशन येथे संपर्क करावा, असे आवाहन प्रा. गोपाल दर्जी यांनी केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा. गोपाल दर्जी यांच्यासह सौ. ज्योती दर्जी, श्रीराम पाटील, रविंद्र लढ्ढा आदींनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version