Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दरेकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मजूर संस्था मतदारसंघातून निवडून आलेले प्रवीण दरेकर यांना अपात्र ठरल्याप्रकरणीगुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या चौकशीकामी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात आज सोमवारी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबई जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर संस्था गटातून विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी निवडणूक लढविली आणि ते बिनविरोध निवडून आले होते. परंतु दरेकर हे मजूर संस्थेचे बनावट श्रीमंत मजूर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार दरेकर यांच्याविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत. दरम्यान बनावट मजूर सदस्य असलेल्या प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या मागील पाच वर्षांच्या कामकाजाची चौकशी देखील करण्याचे आदेश सहकार विभागाकडून देण्यात येऊन कारवाई का करू नये अशी नोटीस देखील बजावण्यात आली होती.

अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश
या सुनावणीस दरेकर प्रत्यक्ष हजर न राहता प्रतिनिधींतर्फे म्हणणे मांडले. त्यांचे म्हणणे समाधानकारक नसल्याने मुंबई सहकार विभागाचे सहनिबंधक यांनी प्रवीण दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्यपदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात येत असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे बनावट मजूर म्हणून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दरेकर यांच्याविरुद्ध आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीविरुद्ध दरेकर यांनी गुन्हा रद्द व्हावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका प्रलंबित ठेवत अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाने दरेकर यांनी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत.

Exit mobile version