Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वादग्रस्त वक्तव्ये टाळा, मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवा ; पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचना

sharad pawar in jalgaon

मुंबई (वृत्तसंस्था) वादग्रस्त वक्तव्ये टाळा, सरकार पाच वर्ष टिकवायचे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांशी योग्य समन्वय ठेवा, असा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिल्या आहेत.

मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये पवारांनी आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली होती.
शरद पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठीकत शरद पवारांनी सर्व मंत्र्यांना खात्यांतर्गत निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी समन्वय ठेवा. वादग्रस्त मुद्दे टाळा. वादग्रस्त विधाने करु नका, अशा सूचना दिल्या. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह 16 मंत्री उपस्थित होते.

Exit mobile version