Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दगडफेकीनंतर शिरसोलीत शांतता कमिटीची बैठक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथे व्हॉटसॲपवर ऑक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर दगडफेक होवून तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी १७ एप्रिल रोजी सकाळी विठ्ठल मंदीरात शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली.

 

याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह गावातील सरपंच, उपसरपं व ग्रामस्थे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे शनिवार १६ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास व्हॉटसअपच्या स्टेटसवरून दोन गटात दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत रहीस युसुफ मणियार यांच्या मालकीची (एमएच १९ सीवाय २७९९) आयशर ट्रक व डॉ. सुफीयान शाहा यांच्या मालकीची (एमएच ०३ एआर १५०८) फोरव्हिलर सेंट्रोकार यांचे काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले. तर अहमद अखिल पिंजारी (वय-१८) हा तरुण रस्त्याने मलीक नगर मध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला होता. शनिवारी हनुमान जयंती असल्याने पोलीस कर्मचारी शिरसोली गावात असल्याने दगडफेक होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

या पार्श्वभूमीवर शिरसोली गावातील विठ्ठल मंदीरात रविवारी १७ एप्रिल रोजी सकाळी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी मार्गदर्शन सांगितले की, व्हॉटसॲपवर आलेला मॅसेजची खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर फॉरवर्ड करून नये, असे पोस्ट आल्यास तातडीने संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार द्या, पोलीस दोषींची गय करणार नाही असे सांगितले.

Exit mobile version