Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दक्षिण भारतात आढळलेला कोरोना सर्वाधिक घातक; मृत्यूचा धोका १५ पटींनी वाढला

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता दक्षिण भारतातील दुसऱ्या लाटेत या विषाणूच्या तीव्रतेमुळे चिंतेत वाढ झाली आहे. हा व्हेरियंट आंध्र प्रदेशमध्ये आढळून आला आहे. या विषाणूला N44OK असं शास्त्रीय नाव आहे. या विषाणूची तीव्रता १५ पटीने अधिक असल्याचं सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीलतील शास्त्रज्ञांनी सांगितलं. या विषाणूमुळे ४ दिवसात रुग्ण बाधित होतो.

 

N44OK हा कोरोनाचा विषाणू B.1.617 आणि B.1.618 व्हेरियंटपेक्षा अधिक घातक असल्याच दिसून आलं आहे. हा विषाणू रुग्णांना लगेच आपल्या कवेत घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  ४ दिवसातच रुग्णाची स्थिती खालावत असल्याने चिंता वाढली आहे. हा व्हायरस तरुणांमध्ये मोठ्या संख्येने पसरत आहे.   व्यायाम आणि रोग प्रतिकारशक्ती अधिक असलेल्या लोकांवरही भारी पडत आहे.

 

दक्षिण भारतात N44OK हा व्हायरस आपले पाय पसरत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या दक्षिण भारतात B.1, B.1.1.7, B.1.351,B.1.617 आणि B.1.36 (N44OK) या व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळत आहेत.

 

देशात B.1.1.7 या व्हेरियंटची सर्वाधिक नागरिकांना बाधा झाली आहे. मात्र आता समोर आलेला विषाणू सर्वाधिक घातक असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काळजी घेणं गरजेचं आहे

Exit mobile version