थोरगव्हाण जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले निसर्ग शिक्षण

yawalnews

यावल प्रतिनिधी । शिक्षण केवळ चार भिंतीचा आत नव्हे तर निसर्गाच्या खूशीतुन अनौपचारिक पध्दतीने घेता येते कारण निसर्ग सर्वात मोठा गुरु असुन माणसाला माणुस बनविण्याची शिकवण देत असतो. म्हणून थोरगव्हाण जि.प.शाळेने क्षेत्र भेट उपक्रम अंतर्गत नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या थोरगव्हाण शिवारात एका शेताला भेट देऊन भोजनाच्या आस्वाद घेतला.

निसर्ग क्षेत्र भेट अंतर्गत शेतातील बंधारे, तलाव, शेतीचे मशागत व फळ लागवड यबाबतची माहीती मुख्यध्यापक महेद्र देवरे यांनी दिली. विद्यार्थाना निसर्ग शिक्षणाबरोबर जीवन शिक्षण मिळण्यास मदत होईल असे उदगार सरपंच उमेश सोनवणे यांनी निसर्ग क्षेत्र उपक्रमाला भेट दिली असता शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. एकीकडे जिल्हा परिषद च्या शाळा कात टाकत असताना विविध उपक्रमातुन थोरगव्हाण येथील जिल्हा परिसद शाळे च्या माध्यमातुन विद्यार्थाच्या सर्वागीण विकासा व्हावा या साठी प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्याची पट संख्या वाढ करणे व इंग्रजी माध्यमातील शाळेकडे वळलेल्या पालकवर्गातील कल आपल्या शाळेकडे वेधन्यासाठी शाळा व्यवस्थापन समीती व लोकसहभागातुन विद्यार्थांच्या सर्वांगीण विकास व्हावा दृष्टीकोणातुन विविध उपक्रम राबवित आहे.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परीश्रम
याकामी शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे, उपाध्यक्ष निवृती चौधरी, सदस्य विनोद भालेराव, सुरेश चौधरी, माजी उपसंरपच समाधान सोनवणे, विनोद पाटील, निलेश पाटील, उपशिक्षक एकनाथ सावकारे, निलेश पाटील, शेतमालक नानासाहेब पाटील यांनी परीश्रम घेतले.

Protected Content