Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ प्रकरणातून प्रवीण चव्हाण यांना हटविले !

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी गंभीर आरोप केलेले प्रवीण चव्हाण यांना राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्या भ्रष्टाचारा प्रकरणात विशेष सरकारी वकील पदावरून हटविण्यात आले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्यावर खटला सुरू असून त्यात विशेष सरकारी वकील म्हणून चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. या खटल्यात अजय मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिसर यांनी याबाबत न्यायालयाला त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना न्यायालयात सादर केली. चव्हाण हे २०१६ पासून कदम यांच्याविरुद्धच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत होते.

दरम्यान, चव्हाण यांनी भाजप नेत्यांना खोटया प्रकरणांत अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आ. गिरीश महाजन यांनी केला होता मार्च महिन्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सभापतींकडे चित्रफीत सादर केली होती. त्याद्वारे चव्हाण हे भाजप नेत्यांना खोटया प्रकरणांत गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. ही चित्रफीत महाजन यांच्याशी संबंधित असून त्यांनीही त्यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. यानुसार महाजन यांच्या विरोधातील गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. तर यानंतर आता प्रवीण चव्हाण यांना दुसर्‍या महत्वाच्या खटल्यातून हटविण्यात आले आहे.

Exit mobile version