Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ पोलिसामुळे जामनेरात कोरोनाचा शिरकाव; संपर्कातील लोक क्वॉरंटाईन

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथील मुळ रहिवासी असलेल्या व चाळीसगाव येथे कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाला कोरोना झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्यामुळे अखेर जामनेर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर या पोलिसाच्या संपर्कात आलेल्या १४ जणांपैकी पाच जणांना पळासखेडा येथील धारीवाल पॉलीटेक्नीक कॉलेजच्या वसतीगृहात कोरंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, पळासखेडा येथील मुळ रहिवासी व सध्या चाळीसगाव येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याची माहती वैद्यकीय सुत्रांनी दिली. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या जामनेर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. सहा दिवसांपुर्वी हा पोलिस चाळीसगाव येथून सुटीवर घरी आला. घरी आल्यानंतर तो आजारी पडला. उपचारासाठी जामनेर येथील तीन दवाखाने व एका पॅथॉलॉजी लॅबवर तो गेला. शिकात जाण्यासाठी पोलिस ठाण्यातून अर्ज घेण्यासाठीही तो जामनेर पोलिस ठाण्यात आला असल्याची माहती सुत्रांनी दिली. असे तीन दिवस जामनेर शहरात फिरल्यानंतर पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे यांनी त्यास जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची सुचना केली. त्यानुसार तो जिल्हा रूग्णालयात गेला. एकंदरीत लक्षणे पहाता त्याचा कोरोनासाठीचा आवश्यक तो स्वॅब घेण्यात आला. मंगळवार ता. १९ रोजी त्याचा अहवाल पॉझेटीव्ह आला.

दरम्यान, त्याच्या संपर्कात असलेल्या १४ जणांची माहती जिल्हा रूग्णालयातर्फे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांना देण्यात आली. त्यानुसार त्यांनी १४ पैकी पाच जणांना ताब्यात घेऊन पळासखेडा येथील धारीवाल पॉलीटेक्नीक कॉलेच्या कोवीळ सेंटरमध्ये ठेवण्यात आले. भुमिपुत्र असलेल्या पोलिसाचा अहवाल पॉझेटीव्ह येताच पळासखेडा सिल करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे, शेंदुर्णी येथे रूग्णालय चालविणारा पाचोरा येथील डॉक्टरला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या शेंदुर्णीच्या त्याच्या रूग्णालयातील नर्स, पॅॉलॉजीस्ट व अन्य काही कर्मचार्‍यांना पहूर व पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. पैकी निकट संपर्कामधील काहींचे स्वॅब घेण्यात आले असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेंदुर्णीकरांना या अहवालाची प्रतिक्षा असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version