‘त्या’ पार्टीत होता भाजप नेत्याच मेव्हणा ! : मलिक यांचा गौप्यस्फोट

मुंबई प्रतिनिधी | क्रूझवरील कारवाईत दोन जणांना सोडून देण्यात आले असून यातील एक हा भाजप नेत्याचा मेव्हणा असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणात एकूण १२ जणांना अट करण्यात आली होती. यातील सोडण्यात आलेल्या त्या दोन लोकांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का असा सवाल उपस्थित होत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

भाजपचा कोण नेता आहे त्याचे नाव उद्या घोषित करणार असल्याचे सांगतानाच एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट देताना ८ ते १० लोकांना पकडले आहे असे सांगितले होते. कारवाई करणारा एक अधिकारी असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो असा सवालही नवाब मलिक यांनी केला. यामध्ये राजकीय व्यक्ती आहे. त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा असा सवाल नवाब मलिक यांनी करतानाच एनसीबीला याचे उत्तर द्यावंच लागेल असेही नवाब मलिक म्हणाले.

Protected Content