Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ दोन आमदारांचा प्रस्ताव फेटाळला !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमच्या अपात्रतेचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना अधिकार नसल्याची तक्रार करणार्‍या दोन अपक्ष आमदारांचा दावा फेटाळण्यात आलेला आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भूमिका अतिशय महत्वाची असेल असे स्पष्ट झाले होते. यानुसार झाले देखील तसेच ! त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी अजय चौधरी यांच्या शिवसेनेकडून आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर त्यांनी १६ आमदारांना अपात्रतेच्या नोटीसा देखील बजावण्यात आलेल्या असून सोमवारी सायंकाळपर्यंत याला उत्तर देण्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नरहरी झिरवाळ हे अजून कडक भूमिका घेऊ शकतात अशी शक्यता लक्षात घेऊन अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि महेश बालदी यांनी या विरोधात तक्रार दाखल केली होती.

विधानसभा उपाध्यक्षांना आमच्या सारख्या अपक्ष आमदारांना अपात्र करू शकत नाहीत, असा दावा करत त्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांची ही मागणी फेटाळण्यात आलेली आहे. यामुळे आता हे दोन्ही आमदार न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Exit mobile version