Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ तरुणावर धारदार शस्त्राचे तीन वार !

जळगाव (प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकाबाहेर काही जणांच्या एका टोळीने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली होती. जखमी तरुणाचे नाव चेतन संजय करोसिया (वय २५ रा. वाघनगर) असे आहे. चेतनवर धारदार शस्त्राचे तीन ठिकाणी वार करण्यात आले आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, चेतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. आज त्याच्या मुलाच्या जाऊळचा कार्यक्रमासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या पाहुण्यांना घेण्यासाठी चेतन आज दुपारी रेल्वे स्थानकावर गेला होता. यावेळी काही तरुणांच्या टोळीने चेतनवर हल्ला चढविला. यात चेतनच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी वाघ नगर परिसरातील झालेल्या लग्नात वाद झाले होते. यावेळी चेतनने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनंतर सायंकाळी चेतन काही तरुणांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्याच्यावर थेट हल्ला केला. दरम्यान, भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

Exit mobile version