Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

” त्या ” जिलेटीन कांड्यांचे उत्पादन नागपूरातले

 

मुंबई : वृत्तसंस्था । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कारमधील जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे.

 

विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात. सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी यासंबंधी मुंबई पोलिसांनी माहिती दिल्याचे सांगितले.

 

“गुरूवारी मध्यरात्री क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्ह मध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली’, असे सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले.

 

मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली. ही कार रोडवर अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घटनेनंतर अंबानींच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

 

Exit mobile version