Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ अवैध दारूविक्रेत्यांवर गुन्हा; आंदोलकांवरही कारवाई

FIR

धरणगाव प्रतिनिधी | शहरातील पारधी वाड्यातील स्त्री-पुरूषांनी अवैध दारूविक्रीच्या केलेल्या मागणीनंतर आज पोलिसांनी धडक कारवाई करून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तर आंदोलकांवर देखील कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, ०१/१०/२०२१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील पारधी वाडा भागातील काहीमहीला व पुरुष धरणगाव पोलीस स्टेशनला त्यांचे आपसातील भांडणाची तक्रार देण्यासाठी आले होते. पोलीस ठाणे अंमलदार यांनी एका पार्टीची तक्रार घेण्यास सुरुवात केली असतानाच समोरी लोकांनी बस स्थानकासमोर रोडवर बसुन रास्ता रोको करुन घोषणाबाजी केली होती.

दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन आज पारधी वाडा भागातील दारु विक्री करणार्‍यांच्या घरी छापे मारण्यात आले. यात या पथकाने पारधी वाडा भागात अवैधरीत्या दारु कब्जात बाळगुन तिचे चोरटी विक्री करणारे राजेंद्र सुकलाल मराठे यांच्यासह दोन महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.

यासोबत गैरकायद्याची मंडळी जमवुन त्यांना चिथावणी देवुन कायदा हातात घेवुन रास्तारोको करणार्‍या लोक व इतर १५ ते २० अज्ञात लोकांविरुध्द देखील धरणगाव पोलीस स्टेशनला कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील जमावबंदीचे आदेश लागु आहेत. तसेच कोविड १९ विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आपली काही तक्रार असल्यास आपण कायदा हातात न घेता सनदशीर मार्गाने मांडावी. तसेच कोणत्याही अवैध धंद्याबाबत आमच्याशी संपर्क केल्यास त्याची दखल घेण्यात येईल. गैरकायदेशीर कृत्य केल्यास यापुढे देखील त्यांचे विरुध्द प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल असे धरणगाव पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version