Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

त्यांना पवार साहेबांना इजा करायची होती : आव्हाड यांचा दावा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा  | सिल्व्हर ओकवरील हल्ला प्रकरणाच्या मागे बरेच काही शिजले होते. हल्लेखोरांना शरद पवार साहेबांना इजा करायची होती असा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी जमलेल्या एसटी कर्मचार्‍यांनी धुडगुस घातल्यावरून पोलिसांनी कारवाई करत १०९ आंदोलक कर्मचारी आणि आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. सदावर्तेंना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून इतर आंदोलकांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेले ट्विट चर्चेत आले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, परवा साहेबांच्या (शरद पवार) घरी हल्ला झाला. हल्ला करणार्‍यांचा हेतू स्वच्छ नव्हता. त्यांनी शरद पवारांच्या घराची रेकी केली होती. त्यांना शरद पवारांना शारिरीक इजा करायची होती. महाराष्ट्राचं नशीब असं काही घडलं नाही, असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Exit mobile version