Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तेली समाजातर्फे माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

चोपडा, प्रतिनिधी | समाज माता  माजी खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर यांचा स्मृती दिवस चोपडा तेली समाजाने त्यांना अभिवादन करून साजरा केला.

प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा, श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा ,महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, श्रीराम नगर, चोपडा येथे स्वर्गीय काकूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय काकूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, समाजातील पदाधिकाऱ्यांनी, प्रदेश तेली महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुष्पांजली अर्पण केली. समाज बांधवांनी दीप प्रज्वलित करून काकूंच्या स्मृतींना उजाळा दिला. चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष, विद्यावाचस्पती, राज्य आदर्श शिक्षक, निवृत्त मुख्याध्यापक टी. एम. चौधरी यांनी काकूंना भावपूर्ण आदरांजली  वाहतांना काकूंच्या कार्याचा गौरव केला.  के. डी. चौधरी यांनी अभिवादन करून काकूंच्या सोबत काम केल्याचा आनंद व्यक्त केला. काकू आणि त्यांच्या परिवाराने समाजासाठी घेतलेल्या कष्टाची आठवण करून देत अण्णा साहेबांच्या मागे समाज खंबीरपणे उभा असल्याचे नमूद केले. यावेळी टी. एम .चौधरी, आदर्श शिक्षक संजय चौधरी, महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवकांत के. चौधरी, तालुकाध्यक्ष प्रशांत चौधरी ह-भ-प गोपीचंद महाराज, ह भ प ज्ञानेश्वर नेरकर महाराज आदी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Exit mobile version