Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तेजस्वी यादव यांचे शरद पवारांकडून कौतुक

 

पुणे : वृत्तसंस्था । “मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान खूप रस घेत होते. एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते.तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

बिहार निवडणुकीचे अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्र होणार असून सध्याची आकडेवारी पाहता बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

“आज जरी बदल झाला नसला तरी हळूहळू बदल होत असल्याची वाट दिसू लागली आहे. नितीश कुमार यांना अजिबात फटका बसणार नाही असं सांगितलं जात आहे. भाजपाची संख्या वाढली, पण नितीश कुमार यांची संख्याही कमी झाली आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं. “तेजस्वी यादव यांना जितके मोकळे हात मिळतील तेवढं चागलं असं मत होतं, त्यामुळे तिथे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे असा टोला त्यांनी लगावला.

“जगातील मोठी लोकशाही म्हणून अमेरिकेला ओळखलं जातं. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल काहीही असो, जागा दिली नाही म्हणून नाउमेद होऊन टोकांची भूमिका घेऊ नये. हा लोकांचा अधिकार आहे. निर्णय इतका स्वच्छ लागल्यानंतर अशा प्र्कराची वक्तव्यं करणं त्यांच्या वयाला शोभत नाही,” असं शरद पवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उल्लेखून म्हटलं. मी १४ वेळा निवडणुकीला उभं राहिलो, कधी पाडलं नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं असा टोला शरद पवारांनी लगावला.

Exit mobile version