Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी केंद्र सरकारने आपली ओळख निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय पार्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी नाव नोंदणी करण्यात यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाने तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम कायदा, 2019 पारित केला आहे. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 7 ऑक्टोंबर, 2020 अन्वये तृतीयपंथीयांच्या समस्या/तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

 

त्या अनुषंगाने सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय व्यक्तींसाठी “NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSONS” (https://transgender.dosje.gov.in) राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन भेट देऊन ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळणेकरिता नोंदणी करावी. नोंदणी करण्यास काही अडचणी आल्यास सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर, महाबळ रोड, जळगाव 425001 येथे समक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक 0257-2263328/29 वर संपर्क करावा. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version