Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तुकारामवाडीत शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत दुचाकी जळून खाक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तुकारामवाडी परिसरात एका लाकडी पार्टेशन घराला महावितरण मीटरच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पार्किंगला लावलेली दुचाकी जळून खाक झाल्याची घटना १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. सुदैवाने नागरीकांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे.

अधिक माहिती अशी की, संतोष खंडू माळी (वय-४३) रा. गणपती नगर, तुकाराम वाडी हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराच्या बाजूला निलेश शंकर चौधरी यांचे लाकडी पार्टेशनचे घर आहे. या घरात कोणीही राहत नाही. त्यामुळे संतोष माळी यांनी दोन वर्षांपुर्वी घेतलेली दुचाकी त्यांच्या घराच्या समोर दररोज पार्किंग करून लावतात. १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता माळी यांनी दुचाकी पार्टेशनच्या घरासमोर लावली होती. रात्री सर्वजण झोपले. मध्यरात्री अचानक महावितरणच्या ईलेक्ट्रिक मीटरचा शॉर्टसर्किट झाल्याने विद्यूत पोलवरील वायरने पेट घेतला. वायर पेटत असतांना काही ठिणगी दुचाकीवर पडली त्यामुळे काही वेळाने दुचाकीनेही पेट घेतला. घराला आग लागल्याचे घरासमोर राहणाऱ्या तरूणाच्या लक्षात आलाने आरडाओरड केला. गल्लीतील सर्व नागरीकांनी स्थळी धाव घेवून तात्काळ टाकीतल्या पाण्याचे आग विझविली. दरम्यान अजून अर्धातास उशीर झाला असता तर घरात ठेवलेले दोन गॅसचे सिलेंडरचा स्फोट होवून मोठी झाली असता. मात्र तरूणाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला . या आगीत नवीन दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाली आहे. संतोष माळी यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मिलींद सोनवणे करीत आहे.

Exit mobile version