Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत्याचा अत्याचार !

पुणे : वृत्तसंस्था । पिंपरी-चिंचवड शहरात तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत चुलत्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३४ वर्षीय नराधम आरोपीला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

आई घराबाहेर कपडे धूत असताना चिमुकली चुलत्याच्या घरी गेली. तेव्हा, चुलत्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

आरोपी आणि तीन वर्षीय पीडित चिमुकलीचे कुटुंब हे शेजारी राहतात. गुरुवारी दुपारी चिमुकलीची आई कपडे धूत असताना पीडित मुलगी चुलत्याच्या घरी गेली. तेव्हा, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्या वेळी ही सर्व घटना घडली तेव्हा आरोपीच्या घरी कोणी नव्हते. सर्व जण लग्नसोहळ्यासाठी गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचा विवाह झालेला असून त्याला देखील लहान मुले आहेत.

दरम्यान, चिमुकली दिसत नसल्याने तिच्या आईने तिचा शोध घेतला. शेजारी शोधलं, त्याचवेळी आरोपीचा दरवाजा ठोठावला, पहिल्यांदा आत मधून प्रतिसाद आला नाही. मग, पुन्हा आवाज दिला. आरोपीने दरवाजा उघडला. पीडित चिमुकली रडत रडत आईकडे आली तेव्हा हा सर्व गंभीर प्रकार समोर आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता उबाळे यांनी दिली .

Exit mobile version