Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन लाखांसाठी विवाहितेला बेदम मारहाण करून दुखापत

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील माहेर असलेल्या विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी तीन लाखांची मागणी करत तिला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील माहेर असलेल्या सुमैय्या अनवर कुरेशी (वय-२४) यांचा विवाह भोपाल राज्यातील हुजूर येथील अनवर हारून कुरेशी यांच्याशी १३ फेब्रुवारी २०२० रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर पती अनवर याने विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून तीन लाखांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून पती अनवर याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत विवाहितेचा दात तोडून गंभीर जखमी झाल्या. तसेच सासू, सासरे आणि दीर यांनी देखील गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. बुधवारी ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अनवर हारून कुरेशी, सासरे हारून हुसेन कुरेशी, सासू आरेफा हारून कुरेशी, दीर शाहरूख हारून कुरेशी, जमील हारून कुरेशी सर्व रा. हुजूर भोपाल यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मोती पवार करीत आहे.

Exit mobile version