Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन दहशतवादी ठार ; एक जवान शहीद

पुलवामा, वृत्तसंस्था । सुरक्षा जवान आणि दहशतवादी यांच्यात शुक्रवार-शनिवारच्या रात्री उशिरापासून पुलवामाच्या जदुरा भागात सुरू झालेली चकमक अजूनही सुरू आहे. . आत्तापर्यंत सुरक्षा यंत्रणेनं तीन दहशतवाद्यांना ठार केले . परंतु, चकमकीत एका जवानालाही प्राण गमवावे लागले. पोलीस आणि सुरक्षा दलाकडून संयुक्तरित्या हे ऑपरेशन राबवण्यात येतंय. पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला.

शुक्रवारी एका चकमकीत शोपियाँ जिल्ह्यातील किलौरा भागात चार दहशतवादी टिपल्याचं काश्मीर पोलिसांचे महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं होतं. यावेळी, एक दहशतवाद्याला जिवंत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालं. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये शकूर पार्रे हा जम्मू-काश्मीर पोलिसांचा माजी कर्मचारी आणि अल – बद्र संघटनेचा जिल्हा कमांडर होता. किलुरा भागात दहशतवादी उपस्थित असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाच्या हाती लागली होती. त्यानंतर परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं.

Exit mobile version