Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन एकरमध्ये कांदा बिजवाई शेती : पाच लाखाचे उत्पन्न अपेक्षित

 

 

पाचोरा, प्रतिनिधी !  तालुक्यातील लोहटार  येथील विजय वाणी या शेतकऱ्याने यंदा ३ एकर शेतात फक्त कांद्याचे बियाणे तयार करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे . निसर्गाने साथ दिली तर मलाही उत्पन्न मिळेल आणि परिसरातील शेतकऱ्यांना सहज बियाणे उपलब्ध होईल असे ते म्हणाले .

 

तालुक्यातील लोहटार येथील प्रगतशील शेतकरी विजय रामकृष्ण वाणी गेल्या ४५ वर्षांपासून शेती  करतात  त्यांचे मालकीची परिसरात १०० एकर जमीन आहे. या १०० एकर शेत जमिनीवर पाण्याचे स्रोत्र म्हणुन चार विहीरी, दोन बोअरवेल, चार शेततळे आहेत. या पाण्याच्या सोत्रातुन त्यांनी संपूर्ण १०० एकर शेत शिवार हे  टेलिफोन लाईन प्रमाणे जोडले आहे.

 

या १०० एकर शेत जमिनीमध्ये विजय वाणी  गहू , बाजरी, ज्वारी, मका, लिंबु, कांदा मोसंबी, हळद, अद्रक, सुबाभुळची लागवड करत असतात. यावर्षी कांद्याचे भाव कडाडले असुन त्यांनी तीन एकर जमीनीवर कांदा बिजवाई शेती केली आहे. यासाठी कांदा पिकासाठी नियमित खते, फवारणी करीत असुन पुढील येणाऱ्या काळात जर निसर्गाची साथ मिळाल्यास या कांद्यांच्या बिजवाई पासुन त्यांना साडेचार ते पाच लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे.

Exit mobile version