Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तिरंगा एक्सप्रेसचे स्वागत : खा. उन्मेष पाटलांचा प्रवास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ ते इगतपुरी मेमू तिरंगा एक्सप्रेसचे जळगावात उदंड उत्साहात स्वागत करून खासदार उन्मेषदादा पाटील यांनी यातून चाळीसगावपर्यंत प्रवास केला.

भुसावळ ते इगतपुरी मेमू एक्सप्रेसला तिरंगा एक्सप्रेस म्हणून परिवर्तीत करण्यात आले असून आज सकाळी सात वाजता भुसावळ स्थानकावरून ही रेल्वे गाडी रवाना झाली. खासदार रक्षाताई खडसे आणि आमदार संजय सावकारे यांची याप्रसंगी उपस्थिती होती. यानंतर जळगाव स्थानकावर या ट्रेनचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, अमोल शिंदे, हर्षल चौधरी आदींसह  अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

जळगाव स्थानकावरून खासदार उन्मेष पाटील हे तिरंगा एक्सप्रेसमध्ये बसले. प्रत्येक स्थानकावर या रेल्वेगाडीचे जल्लोषात स्वागत झाले. तर खासदार पाटील यांनी संपूर्ण डब्यांमधून रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. चाळीसगाव रेल्वे स्थानकावर खासदार पाटील हे आपल्या सहकार्‍यांसह उतरले. यानंतर ट्रेन पुढे रवाना झाली.

 

Exit mobile version