Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तिक्ष्ण हत्यारासह एकाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिरसोली नाका परिसरात कमरेला लोखंडी तिक्ष्ण हत्यार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिरसोली नाका परिसरात गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी (वय-२२) रा. सद्गुरु नगर, शिरसोली नाका, तांबापुरा हा तरुण १५ इंच लांबीचा लोखंडी तिक्ष्ण हत्यार हातात घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवार १३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता कारवाई करत संशयित आरोपी गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील १५ इंच लांबीचा लोखंडी तिक्ष्ण हत्यार हस्तगत केला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल रगडे यांच्या फिर्यादीवरून गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहे.

Exit mobile version