Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तिक्ष्ण हत्याराने एकावर प्राणघातक हल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरात पैसे मागण्याच्या कारणावरून एकावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २६ जून रोजी रात्री उशीरात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात शंकर सपकाळे हे पत्नी पुजा शंकर सपकाळे यांच्यासह वास्तव्याला आहे. रविवारी २५ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पुजा सपकाळे आणि तिचे पती शंकर सपकाळे हे शहरातील गेंदालाल मील परिसरातील दिशा मेडीजवळ उभे असतांना पूजाचा भाऊ राकेश अशोक सोये रा. गेंदालाल मील, जळगाव हा तिथे आला. त्यानंतर पैशांच्या वादातून पूजाच्या भाऊ राकेश सोये याने शंकर सपकाळे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर जीवेठार मारण्याची धमकी देत त्याच्याजवळील चाकूने शंकर यांच्यावर वार केले. यात शंकर सपकाळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पुजा शंकर सपकाळे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाऊ राकेश अशोक सोये याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहे.

Exit mobile version