Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तालुका सार्वजनिक वितरण रेशनिंग कमिटी तालुका अध्यक्षपदी पवार

 

कासोदा, प्रतिनिधी । तालुका सार्वजनिक वितरण ( रेशनिंग ) कमिटी गठीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनान्वये व अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्दोशनानुसार एरंडोल तालुका अध्यक्षपदी सुरेश कौतिक पवार कासोदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एरंडोल तालुका सार्वजनिक वितरण ( रेशनिंग ) कमिटीचीच्या अध्यक्षपदी सुरेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणीत सचिवपदी सुपडू ममराज पवार, सदस्यपदी सत्तार बाबु खाटीक , मकसूद मासूम पटेल, ज्ञानेश्वर संतोष भिल, कल्पना अंबादास लोठार, निजामुद्दीन अमिरुद्दिन शेख कासोदेकर सुनील गोविंदा पाटील, सुक्राम भिल, इमरान मुस्ताक सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, सदस्यांनी कोविंड 19 च्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या रेशनिंगविषयी तक्रारीचे निवारण करायचे आहे. प्रशासन लाभार्थ्यांशी समन्वय साधावयाचा आहे. याकामी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे. आपण पण सर्वसामान्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतील अशी खात्री आहे. नियुक्तीचे पत्र जळगाव सार्वजनिक वितरण कमिटी ( रेशनिंग ) जिल्हा अध्यक्ष प्रदीपराव गुलाबराव पवार यांच्या सहीने दिले आहे.

Exit mobile version