Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तालुकास्तरीय महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठीत

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार पारोळा तालुकास्तरीय महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत पत्रकार विश्वास चौधरी, रमेश जैन यांची नियुक्तीकरण्यात आली आहे. 

 

 

तालुकास्तरीय महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे तहसीलदार व पंचायत समिती सभापती हे पदसिद्ध अध्यक्ष, सहअध्यक्ष तर पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, सर्व जि. प. सदस्य, भूमापन अधिकारी, सरकारी वकील हे पदसिद्ध सदस्यसह पत्रकार प्रतिनिधी म्हणून दिव्यमराठीचे तालुका प्रतिनिधी विश्वास चौधरी व पुण्यनगरीचे प्रतिनिधी रमेश जैन, अॅड. वेदव्रत काटे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्या शिफारसीवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.

 

Exit mobile version