Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तालुकास्तरीय दक्षता समिती अशासकीय सदस्यपदी सरफराज तडवी व चंद्रकला इंगळे

यावल, प्रतिनिधी | यावल तालुका पातळीवरिल दक्षता समितीवर अनुसुचित जमातीचे प्रतिनिधी म्हणुन अशासकीय सदस्यपदी यावल पंचायत समितीचे सदस्य सरफराज सिकंदर तडवी आणि अनुसुचित जातीच्या प्रतिनिधी म्हणुन अशासकीय सदस्य म्हणुन कॉंग्रेस कमेटीच्या जळगाव जिल्हा अनुसुचित जाती सेलच्या उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.

 

यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशान्वये सरफराज तडवी आणि चंद्रकला इंगळे यांची तालुकास्तरीय अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल पंचायत समितीचे काँग्रेस गटनेते तथा संजय गांधी समितीचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील , जिल्हा परिषद गटनेते व काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , पंचायत समिती सदस्य कलीमा सायबु तडवी , उमाकांत रामराव पाटील, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, दहिगावचे उपसरपंच किशोर महाजन , मारूळ सरपंच सैय्यद असद जावेद अली, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , उपाध्यक्ष अनिल जंजाळे, यावल नगरसेवक मनोहर सोनवणे, शिला सोनवणे , नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, नगरसेवक अस्लम शेख नबी, समिर शेख मोमीन यांनी स्वागत करून अभीनंदन केले आहे.

Exit mobile version